कशेडी घाटातील रस्ता खचत असल्यामुळे केंद्राकडे पाठपुरावा

0

खेड : कोकणातील जनतेला गणेशोत्सवादरम्यान येण्याजाण्याचा मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या कशेडी घाटातील रस्ता खचत असल्याकडे गेली अनेक वर्षे खासदार असूनही त्यांनी दुर्लक्ष केले असले तरी आपण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश असलेल्या लोकसभा मतदासंघाचे खासदार असल्याने केंद्र सरकारचे रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खचणार्‍या रस्त्याच्या उपाययोजनांचा नक्कीच पाठपुरावा करू, अशी ग्वाही खा . सुनील तटकरे यांनी दिली. शनिवारी सकाळी खा. तटकरे यांनी या घाट रस्त्याला भेट दिली. यांच्यासमवेत दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय कदम, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बामणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा तटकरे यांनी, मागील भेटीवेळी या खचणार्‍या कशेडी घाटरस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता बामणे तसेच अन्य यांना परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले याठिकाणी उंच भरावावरून नव्याने तात्पुरता रस्ता तयार करण्यात आलेला दिसून येत आहे. या खचणार्‍या रस्त्यालगतचा उभा कातळ फोडून न खचणारा कायमस्वरूपी रस्ता सुचविला आहे तर याठिकाणी उंच खांब उभारून पूल उभा करण्याचीही सूचना ग्रामस्थानी केली आहे. या दोन्ही पर्यांयांचा विचार करून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंत्यांनी प्रस्ताव तयार केल्यास आपण रायगडचे खासदार म्हणून त्यास मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा निश्चितच  करू आणि याबाबत केवळ खासदार भेटीचा कार्यक्रम अशी मानसिकता अभियंत्यांनी बाळगली तर त्यांच्यावर हक्कभंगाच्या कार्यवाहीसाठी संसदेत आवाज उठवू, असा सज्जड इशाराही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here