रानडुकराची शिकार पडली महागात, खेरवसे येथे तिघांना अटक

0

लांजा : विद्युत तारेच्या विद्युत तारेच्या साहाय्याने शॉक देवून रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी परिक्षेत्र वन अधिकारी साो, रत्नागिरी श्रीम. प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल पाली श्री. गौ.पि.कांबळे, वनपाल लांजा श्री. सागर रं. पताडे , वनरक्षक जाकादेवी श्री. म.ग.पाटील, वनरक्षक लांजा श्री. विक्रम द. कुंभार यांनी तीन जणांना रानडूक्कराचे लोखंडी सुरीच्या साहाय्याने तोंड वेगळे करून मृत रानडूक्कराच्या मासांचे तुकडे करताना रंगेहाथ पकडले आहे. १ ) श्री. विशाल उद्धव चव्हाण, रा. खेरवसे, ता.लांजा, जि.रत्नागिरी – वय वर्ष -३० २ ) श्री. विनोद केशव जाधव, रा. खेरवसे, ता. लांजा, जि.रत्नागिरी – वय वर्ष – ४७ ३ ) श्री. सुनिल अनंत शिंदे, रा. खेरवसे, ता. लांजा, जि.रत्नागिरी – वय वर्ष – ४० वरील तिन्ही आरोपीनी आपला गुन्हा कबुल केलेला आहे. यांच्याकडून लोखडी सुरी – ४ नग, कोयता – १ नग , चाजींग बॅटरी -२ नग, अॅल्युमिनिअम वायर, बायडिंग वायर ) हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ अन्वये , रानडूक्कर ( Wild Boar ) हा वन्यप्राणी अनुसूची ३ मध्ये येतो त्याची शिकार केल्यास ३ वर्षापर्यंत कारावास किंवा २५००० / – रू . दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतुद वन्यजीव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ मध्ये आहे . सदरची कार्यवाही मा . विभागीय वन अधिकारी साो , रत्नागिरी ( चिपळूण ) श्री . रमाकांत शिवाजीराव भवर यांच्या मार्गदर्शना खाली परिक्षेत्र वन अधिकारी साो , रत्नागिरी श्रीम . प्रियंका पंढरीनाथ लगड , वनपाल पाली श्री . गौ.पि.कांबळे , वनपाल लांजा श्री . सागर रं . पताडे , वनरक्षक जाकादेवी श्री . म.ग.पाटील , वनरक्षक लांजा श्री . विक्रम द . कुंभार यांनी कार्यवाही पार पाडली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
08:43 PM 10/Jul/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here