खेडमध्ये बीएसएनएल सेवेचा बोजवारा

0

खेड : शहरातील बीएसएनएल सेवेचा उडालेला बोजवारा कायम असून सेवेतील सततच्या व्यत्ययामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात बीएसएनएलची सेवा पुरती कोलमडल्याने एकमेकांशी संपर्क साधणे अशक्य बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलच्या सेवेमध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढले असून बीएसएनएल पाठोपाठ खासगी मोबाईल सेवांची देखील अंशतः तीच गत झाली आहे. मात्र सर्वाधिक नॉट रीचेबल बीएसएनएल असल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:36 PM 11-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here