चिपळूण बाजारपेठ आज बंद

0

चिपळूण : वाढीव लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर चिपळुणातील व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवसाय सुरू केला असला तरी दर सोमवारी मात्र संपूर्ण बाजारपेठेतील व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. १ ते ८ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. अत्यावश्यक सेवासुविधा वगळता सर्व व्यवहार आठ दिवसांच्या कालावधीत बंद होते. अत्यावश्यक सेवासुविधेतील किराणा, भाजी व्यापाऱ्यांनी देखील या लॉकडाऊनमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. लॉकडाऊन संपता-संपता जिल्हा प्रशासनाने पुन्हा आठ दिवसांचा कालावधी वाढविला. परिणामी, चिपळुणातील व्यापाऱ्यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने देखील नियम, अटींची बंधने घालून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. या बंधनांचे पालन गेल्या दोन दिवसांत व्यापाऱ्यांकडून सुरू झाले आहे. दर सोमवारी चिपळूण बाजारपेठ बंद असते. मात्र, विषाणू संसर्गाची साथ आटोक्यात आणण्याकरिता यापुढे बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी शंभर टक्के बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे औषधे, दूध व वैद्यकीय उपचार वगळता बाजारपेठ बंद राहणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:02 AM 13-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here