चिपळूणमधील डॉक्टरची ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक

0

चिपळूण : क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याच्या बहाण्याने चिपळूणमधील डॉक्टरची ऑनलाइन ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. डॉ. साळुंके यांचे चिपळूणच्या अॅक्सीस बँकेत खाते आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना आवश्यकता नसतानादेखील बँकेने क्रेडिट कार्ड दिले होते. डॉ. साळुंके यांना क्रेडिट कार्डची आवश्यकता नसल्याने त्यानी कस्टमर केअरला करून क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याविषयी सूचना दिली होती. त्यानंतर साळुंके यांना एका अज्ञात इसमाने फोन केला. आपण दिल्लीतून अॅक्सीस बँकेच्या शाखेतून बोलत असून तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी संपर्क केला होता, त्याप्रमाणे तुमचे कार्ड ब्लॉक करीत आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात संबंधित इसमाने क्रेडिट कार्डमधून ३५ हजार ७९९ रुपये काढून घेऊन घेतल्याचे लक्षात आले. तेव्हा डॉ. साळुंके यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 13-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here