कोरोना जनजागृतीसाठी अधिकारी आणि कन्येचा कोरोनायोद्धा म्हणून गौरव

0

रत्नागिरी : कोरोनाच्या महामारीत वाडीवस्तीवर जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतानाच जनजागृती करणारे जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी संजय नलावडे आणि त्यांची कन्या सिमरन नलावडे यांना भारतीय महाक्रांती सेनेने कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरविले आहे. कोरोनाप्रतिबंधासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात संजय नलावडे आणि सिमरन नलावडे यांनी रायपाटण गावच्या वाडीवस्तीवर जाऊन कोरोनाबाबत जनजागृती केली. कोरोनाबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून करोना म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, त्याची लक्षणे कोणती, कोरोनाची लागण झाल्यास प्रत्येकाने कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी जागृती केली. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या योगदानाची दखल भारतीय महाक्रांती सेनेने घेतली आणि त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविले. यापूर्वी त्यांनी युवा संकल्प प्रतिष्ठानतर्फेही कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:02 PM 13-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here