भंडारी समाजाला शैक्षणिक आरक्षणाची गरज

0

सावंतवाडी :  भंडारी समाजाला शैक्षणिक दृष्ट्या पायाभूत सुविधांचे आरक्षण मिळायला हवे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावना भंडारी समाजाचे नेते  माजी आ. शंकर कांबळी यांनी व्यक्‍त केली. ते सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये बोलत होते . भंडारी समाज  गुणगौरव सोहळा प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, अखिल भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,  नगराध्यक्ष बबन साळगावकर, बार असोसिएशनचे अ‍ॅड.संग्राम देसाई, उपसभापती संदीप नेमळेकर, विधिमंडळाच्या अव्वल सचिव सौ.सायली कांबळी, तालुका परिमंडळाचे जगदीश मांजरेकर, ऋजुता कांबळी, जयप्रकाश चमणकर, संदीप परब, गुरुनाथ पेडणेकर, लक्ष्मण धुरी, नितीन शिरोडकर, भूषण पेडणेकर, शर्वरी गावकर, दिलीप गोडकर तसेच भंडारी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. शंकर कांबळी म्हणाले,  यश मिळविण्यासाठी ज्ञाती विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जायला हवे. जिल्ह्यात आज सावंतवाडी भंडारी समाज मंडळ आघाडीवर आहे. गेली 28 वर्षे सातत्याने हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री दीपक केसरकर, बबन साळगावकर, नवीनचंद्र बांदिवडेकर आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. असोसिएशनच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल  अ‍ॅड.संग्राम देसाई, राजाराम म्हाळवणकर, संदीप परब आदींचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, भंडारी समाज बांधवात एकीची भावना आहे. समाजाला शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी मालवणी नटसम्राट मच्छींद्र कांबळी यांच्या नावाने कुडाळ येथे वसतिगृह सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर सावंतवाडी श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नावाने वसतिगृह सुरू केले जाणार आहे.  स्व.बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ना.केसरकर यांनी केले.भंडारी समाजाला उज्ज्वल इतिहास आहे. मी आमदार व पालकमंत्री भंडारी समाज व शंकर कांबळी यांच्या पाठिंब्यामुळे झालो, असे  ना. केसरकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून आपली दिशा ठरवावी असे आवाहन अ‍ॅड.संग्राम देसाई यांनी केले. संदीप परब, बबन साळगावकर, विधिमंडळाच्या अवर सचिव सायली कांबळी, ऋजुता कांबळी, अ‍ॅड.संग्राम देसाई , नवीनचंद्र बांदिवडेकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जगदीश मांजरेकर, दिलीप गोडकर, गुरू पेडणेकर, बाळू साळगावकर, सागर नाणोसकर, देवीदास आडारकर व भंडारी समाज मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केले. गौरवी पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here