कोरोना तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किट खरेदी करण्याची मागणी

0

चिपळूण : चिपळूण शहरात गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपालिकेने रॅपिड टेस्टिंग किटची मागणी करून उपलब्धता करावी, अशी मागणी चिपळूणचे नगरसेवक विजय चितळे यांनी केली आहे. लवकरच येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे येथून गणेशभक्तांचे आगमन शहरात होणार आहे. सध्या चिपळूण शहरात कोरोनाचा प्रसार ज्या प्रमाणात होत आहे, ते लक्षात घेता गणेशोत्सवात कोरोनाचा प्रसार वाढणार आहे. त्यामुळे शहरातून रॅपिड टेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टेस्टिंग होणे गरजेचे वाटते. पालिकेने शहरासाठी ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. विशेष तरतूद करून हे किट खरेदी करावे, अशी मागणी श्री. चितळे यांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 14-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here