घराभोवती कंपाऊंड केल्याचा रागातून ढाकमोलीत एकावर कोयतीने वार

0

चिपळूण : घराच्या भोवती कंपाऊंड केल्याचा राग मनात धरून कोयतीने हल्ला केल्याची घटना ढाकमोली येथे घडली. कोयतीने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची तक्रार मंगेश महादेव सुतार (वय ३५, रा. ढाकमोली कोंड सुतारवाडी) या व्यक्तीने रविवारी सायंकाळी उशिराने सावर्डे पोलिस ठाण्यात केली आहे. या बाबतच्या तक्रारीनुसार फिर्यादी सुतार हे आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस जंगली झाडाच्या फांद्यांनी शनिवार दि. ११ रोजी कंपाऊंड घालत होते. याचवेळी सखाराम तुकाराम सुतार (७४), सुदेश सखाराम सुतार (३८), सुगंधा संदेश डेरवणकर (३२, सर्व रा. ढाकमोली कोंड सुतारवाडी) हे दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास संशयितांनी फिर्यादी मंगेश सुतार यास, तू आताच कंपाऊंड का घातलेस, असे विचारून वाद घालण्यास सुरुवात केली. यावर फिर्यादीने, आमच्या जागेत झाडे लावायची आहेत. तसेच आमच्या घरात जनावरे येतात, असे उत्तर दिले. त्यावरून वाद वाढल्यावर संशयित आरोपी संदेश सुतार व सुगंधा डेरवणकर यांनी तुला मस्ती आली आहे, असे बोलून त्याला पकडून ठेवले व संशयित आरोपी सखाराम सुतार याला बोलावून घेतले. यावेळी सखाराम सुतार हा सोबत कोयती घेऊन आला. यावेळी उर्वरित दोन आरोपींनी त्याला मारून टाका, असे सांगितले. त्यामुळे संशयित सखाराम सुतार याने कोयतीच्या सहाय्याने फिर्यादीवर वार केले. यामध्ये झालेल्या दुखापतीमुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले. या बाबत अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:24 PM 14-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here