कोकणातले पाणी मराठवाड्यापर्यंत नेण्याची कल्पना उपक्रमाचे डोळसपणे स्वागत करूया

0

रत्नागिरी : कोकणचे पाणी मराठवाड्यात जाताना कोकणच्या ज्या ज्या भागातून पुढे जाईल, त्या प्रत्येक भागाची पाणी गरज परिपूर्ण करत ही योजना परिपूर्ण होऊ दे. कोकणातले पाणी मराठवाड्यापर्यंत नेण्याची कल्पना भगिरथासारखी आहे. या उपक्रमाचे डोळसपणे स्वागत करूया असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. प्रचंड पाऊस पडूनही कोकणात पाणी पुरवठ्याचा प्रश्न बिकट आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारूनही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करू या. ही योजना कार्यान्वित होणार असेल तेव्हा हे पाणी एअरलिफ्ट होणार नाही. विविध भागातून ते पुढे जाईल या प्रक्रियेत कोकणातल्या सर्व भागात हे पाणी पोचवण्याचा आग्रह धरून मराठवाड्याकडे पाणी जाताना मध्ये येणाऱ्या कोकणातील सर्व भागांना या पाणी प्रकल्पाचा लाभ व्हावा अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. कोकणचे फुकट जाणारे पाणी जर उपयोगात येत असेल तर दातृत्व गुण ठासून भरलेली कोकणची जनता या उपक्रमाचे स्वागत करेल. पण मराठवाड्याची तहान तृप्त होत असताना ही पाणी योजना कोकणालाही सुजलाम सुफलामबनवण्यासाठी तिचा उपयोग होण्या साठी येथील जनतेने तसेच लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घेऊन या उपक्रमाचा लाभ कोकणाला मिळावा यासाठी जागृतपणे पाठपुरावा करू या असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here