आमदार शेखर निकम यांच्याकडून दहा कोटीचा निधी

0

चिपळूण : चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी आपल्या आमदारकीच्या सात महिन्यांत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून दहा कोटींचा निधी मतदारसंघासाठी मिळविला आहे. त्यातील तीन कोटी देवरूख नगरपंचायतीसाठी, तर सात कोटी रुपयांचा निधी चिपळूण नगरपालिकेसाठी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख मिलिंद कापडी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, चिपळूणला मिळालेल्या सात कोटींच्या निधीतून मुरादपूर येथील महाराष्ट्र हायस्कूल ते पेठामाप हा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलासाठीचा प्रस्ताव सुमारे चौदा कोटींचा असून आमदार निकम यांच्या माध्यमातून मिळालेल्या सात कोटीचा निधी या कामासाठी वापरण्यात येणार आहे. हा पूल झाल्यानंतर गोवळकोटकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठरेल व शहराच्या व बाजारपुलाच्या वाहतुकीवरील ताण कमी होईल, असे श्री. कापडी यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, शिरीष काटकर, सतीश खेडेकर, नगरसेवक बिलाल पालकर, वर्षा जागुष्टे, शिवानी पवार, फैरोजा मोडक, राजू जाधव, मनोज जाधव, अक्षय केदारी, सिद्धेश लाड आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 14-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here