जिल्ह्यात आणखी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

रत्नागिरी : घरडा केमिकल्स येथील कामगारांची खाजगी प्रयोग शाळेत तपासणी करण्यात आली त्यात 30 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 942 झाली आहे. रत्नागिरी दाखल एका कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णाचा आज ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला यामुळे मृतांची संख्या 33 झाली आहे. तर ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 275 आहे.


दरम्यान 7 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 634 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड केअर सेंटर, समाज कल्याण, रत्नागिरी येथून 4 तर जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी 3 रुग्णांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 14-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here