पुरुष व महिला होमगार्डची सदस्य नोंदणी 26 ऑगस्ट रोजी

0

रत्नागिरी दि.19:- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पथक/उपपथकातील एकत्रितपणे नवीन नाव होमगार्ड नोंदणी रत्नागिरी शहर पथक, लांजा, राजापूर, देवरुख, साखरपा, खेड, मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण, अलोरे, खवटी, पोफळी पुरुष व महिला होमगार्डची सदस्य नोंदणी 26 ऑगस्ट 2019 रोजी पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे 7.00 वाजल्यापासून आयोजित करण्यात आली आहे.

      सदर नोंदणीसाठी शारिरीक पात्रता पुरुषांसाठी उंची 162 सेमी, 1600 मीटर धावणे व गोळा फेक चाचणी तसेच महिलांसाठी उंची 150 से.मी., 800 मीटर धावणे व गोळा फेक चाचणी देणे आवश्यक आहे.  शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास, वयोमर्यादा 20 ते 50 वर्षे (दिनांक 28 ऑगस्ट 2019 वयाची 20 पूर्ण झालेला असावा तसेच 25 ऑगस्ट 2019 रोजी वयाची 50 वर्षे झालेला नसावा) आहे. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.  उमेदवारांनी सोबत रेशनकार्ड/आधारकार्ड/निवडणूक कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता दहावी/बारावी/पदवी पास प्रमाणपत्र, तांत्रिक शिक्षण इलेक्ट्रीशियन, आय.टी.आय वाहनचालक इत्यादीचे प्रमाणपत्र, चार पासपोर्ट फोटो व त्याचबरोबर मूळ कागदपत्रांच्या सेल्फ अटेसटेड दोन प्रती आणाव्यात.

      निवड होवून पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनीय अथवा खाजगी सेवेत असतील तर कार्यालयाचे/मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक असल्यास संबंधित प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवाराने नोंदणीसाठी स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची सर्व जबाबदारी उमेदवाराची राहील.  तरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here