चिंताजनक : जिल्ह्यात 89 नवे कोरोना रुग्ण, एकूण बाधित रुग्ण संख्या 1049

0

आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू; एकूण 34 बळी

रत्नागिरी : बुधवारी जिल्ह्यात एकाचवेळी 89 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यात 13 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 13 रुग्ण यासह कळंबनीतील 17, खेड 20, कामथे 19 गुहागर 10, संगमेश्वर 3 आणि दापोलीतील 7 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या 1049 इतकी झाली आहे

दरम्यान,आडे, दापोली येथील 62 वर्षीय महिला कोरोना रुग्णांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता 34 झाली आहे.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 1049

बरे झालेले – 655

मृत्यू – 34

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 360

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:49 PM 15-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here