गुहागर : तालुक्यातील पालशेतमध्ये दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोख ३ हजार रुपये लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना १२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पालशेत मांडवकरवाडी येथे घडली आहे. याबाबत श्रीकांत अनंत मांडवकर (५२, रा. पालशेत, गुहागर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताने त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोख ३ हजार रुपये लांबवले. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 16-Jul-20