देवरूखमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

देवरूख : सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, राजू काकडे हेल्प अॅकॅडमी देवरूख, सावरकर चौक मित्रमंडळ आणि आयटीसीटी विभाग देवरूख ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी २७ बॅग रक्त संकलन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासमोरील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्र. ३ हॉलमध्ये हे शिबिर झाले. उद्घाटनप्रसंगी डॉ.संदीप माने, अपना बँकेचे संतोष केसरकर, महसूल पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अनिल गोसावी, ज्येष्ठ नागरिक अण्णा शहाणे, अॅकॅडमी अध्यक्ष गणेश जंगम, सल्लागार युयुत्सु आर्ते आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडून डॉ. स्वप्नाली शिर्के, योगिता सावंत, भारती डोंगरे, प्रभाकर मुळेकर, कृष्णा मकवाना यांनी काम पाहिले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले. साडवली इंदिरा फार्मसी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचेही सहकार्य मिळाले. यावेळी युवकांनी या राष्ट्रीय उपक्रमात चांगला सहभाग नोंदवला. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ.स्वप्नाली शिर्के, जयवंत वाईरकर, सावरक चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष राजू वणकुद्रे, वैशाली पुजारी, विद्या माने यांनी शिबिरासाठी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:54 PM 16-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here