रत्नागिरी – गणपतीपुळे विकास आराखड्यामधून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील बांधण्यात येणाऱ्या कमानीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीचे आहे. सात मीटरचा रस्ता असून पाच मीटरची कमान बांधली जात आहे. त्याच्या भिंती तिरक्या असून पोलिस चौकीच्या खोल्याही छोट्या आहेत. ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी लक्षात आणून दिली. जिल्हा प्रशासनानेही कमानीचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. चुकीचे काम करणाऱ्या शाखा अभियंता, उपअभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, असे म्हाडाध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी सांगितले.
गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामांचा आरंभ करताना आमदार सामंत यांना विश्वासात न घेता परस्पर कामे सुरू केल्यामुळे पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मालगुंडमधील शिवसैनिकांनी ती बंद पाडली होती.
