रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील भडवले गावाशेजारील डोंगराचं भूस्खलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगर खचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे शिंदेवाडी, देऊळवाडी, बौद्धवाडी इथल्या कुटुंबाना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु स्थलांतरित कुठे व्हायचे, हा प्रश्न कायम आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण असून भेगा कशामुळे पडतात याचा शोध घेण्यासाठी भूगर्भ संशोधन होणे गरजेचे असल्याचं म्हटलं जात आहे.
डोंगराला सुमारे 10 ते 12 फूट खोल आणि 10 ते 15 फूट रुंद भेगा पडल्या आहेत. त्यामुळे एक हजार लोकवस्ती असलेल्या भडवले गावाला धोका निर्माण झाला आहे.
