वृद्ध कलावंत, साहित्यिकांना दोन महिन्यांचे मानधन मिळणार एकत्रित

0

रत्नागिरी : वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरमहा आदा करण्यात येणाऱ्या मानधनापैकी मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन एकत्रितपणे आदा करण्यात येत असून, येत्या आठवड्याभरात ते संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना १९५५-५६ पासून अ, ब व क या वर्गीकरणानुसार मासिक मानधन दिले जाते. कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, उर्वरित मानधनसुद्धा लवकरात लवकर एकत्रितपणे आदा करण्याची विनंती वित्त विभागाला करण्यात आली होती. राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग कलाकारांच्या अडचणी जाणून त्यांच्या पाठीशी यापुढेही समर्थपणे उभा राहील आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांची शासनाने दखल घेतल्यामुळे त्यांना उतारवयात या मिळणाऱ्या रकमेचा उपयोग होणार आहे. त्यामुळे त्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:26 PM 17-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here