८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला विधानभवनात आजपासून सुरुवात

0

मुंबई : विधानभवनात आजपासून तीन दिवसीय ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष श्री. ओम बिर्ला व राज्यसभा उपसभापती श्री. हरिवंश यांचे आगमन झाले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यसभा उपसभापती मा. श्री. हरिवंश यांचे व विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी लोकसभेचे अध्यक्ष मा. श्री. ओम बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

भारतातील राज्य विधीमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६०वी परिषद विधानभवन मुंबई येथे दिनांक २७,२८ व २९ जानेवारी २०२४ आयोजित करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:24 27-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here