रत्नागिरी : दामले विद्यालयाच्या रेहान बनेटी ची राज्यस्तरावर धावण्यासाठी निवड

0

रत्नागिरी : डेरवण येथे झालेल्या जिल्हा निवड चाचणीत शहरातील दामले विद्यालयाच्या चौथीत शिकणाऱ्या रेहान अब्दुल हमीद बनेटी याने १० वर्ष वयोगटात ६० मीटर व १०० मीटर धावणे या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे तो सांगली येथे ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ६० मीटर व १००़ मीटर धावण्यात जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.

रेहानला दामले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. विलास शेंडगे गेली दोन वर्षे मार्गदर्शन करत आहेत. डेरवण येथे जिल्हा निवड चाचणीत रेहानने आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही प्रकारात सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या रेहानचे शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापिका सौ. निलम जाधव व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 27-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here