२१ षटकार, ३३ चौकार! भारतीय फलंदाजाने जगातील वेगवान त्रिशतक झळकावले

0

ग्रवालचे नाव चर्चेचं विषय बनले आहे. हैदराबादच्या संघासोबत खेळताना त्याने २१ षटकार आणि ३३ चौकारांसह १४७ चेंडूत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जगातील सर्वात जलद त्रिशतक ठोकून विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

एवढेच नाही तर तन्मयने आपल्या खेळीदरम्यान असे अनेक विक्रम केले, ज्यामध्ये वीरेंद्र सेहवागचा विक्रमही मोडला.

रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यात अरुणाचल प्रदेश संघाला पहिल्या दिवशी हैदराबादने १७२ धावांत गुंडाळले. यानंतर हैदराबादकडून सलामीला आलेल्या तन्मय अग्रवालने कर्णधार राहुल सिंगसह दमदार फटकेबाजी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात जलद त्रिशतक झळकावले. दिवसअखेर तो १६० चेंडूंत ३३ चौकार आणि २१ षटकारांसह ३२३ धावांवर नाबाद राहिला. त्याच्याशिवाय कर्णधार राहुलने १०५ चेंडूंत २६ चौकार आणि तीन षटकारांसह १८५ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने पहिल्या दिवशी ४८ षटकांत १ गडी गमावून ५२९ धावा केल्या होत्या.

तन्मयने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मरैसचा १९१ चेंडूंत ३०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. २०१७ मध्ये बॉर्डर संघाकडून खेळताना मार्कोने इस्टर्न प्रोव्हिन्सविरुद्ध प्रथण श्रेणी क्रिकेटमधील वेगवान त्रिशतकाची नोंद केली होती. तन्मयने शइवाय रवी शास्त्री यांचा ३९ वर्षांपूर्वीचा एक विक्रमही मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतकाचा विक्रम तन्मने ११९ चेंडूंच्या खेळीसह नावावर केला. इतिहासातील हे दुसरे वेगवान द्विशतक ठरले. त्याने विरेंद्र सेहवागचा विक्रमही मोडला. सेहवाने २७८ चेंडूंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिनशे धावा केल्या होत्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील वेगवान त्रिशतकवीर

  • १४७ चेंडू – तन्मय अग्रवाल ( हैदराबाद वि. अरुणाचल प्रदेश, २०२४)
  • १९१ चेंडू – मार्को मरैस ( बॉर्डर वि. इस्टर्न प्रोव्हिन्स, २०१७-१८)
  • २३४ चेंडू – केन रुथरफोर्ड ( न्यूझीलँडर्स वि. डीबी क्लोज, १९८६)
  • २४४ चेंडू – व्हिव्हियन रिचर्ड्स ( सोमरसेट वि. वॉर्विकशायर, १९८५)
  • २४४ चेंडू – कुसल परेरा ( कोल्ट क्रिकेट क्लब वि. सरासेन्स स्पोर्ट्स क्लब, २०१२-१३)

कोण आहे तन्मय अग्रवाल?
तन्मयचा जन्म ३ मे १९९५ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रुची असल्याने तन्मयला हैदराबादच्या अंडर-१४ संघात प्रथम स्थान मिळाले. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि हैदराबादसाठी अंडर-१६, अंडर-१९, अंडर-२२ आणि अंडर-२५ अशा सर्व वयोगटांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले. तन्मयने २०१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आत्तापर्यंत त्याने हैदराबादसाठी ५६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३५०० हून अधिक धावा केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 27-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here