IND vs ENG 1st Test Day 3 : तिसरा दिवस इंग्लंडचा, पोपने उडवली भारताची झोप, ऑलीच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडची भारतावर मोठी आघाडी

0

हैदराबाद : ऑली पोपने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची झोप उडवल्याचे पाहायला मिळाले. कारण या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. पण त्याचवेळी पोपने नाबाद १४८ धावांची खेळी साकारली आणि भारतीय संघाचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. पोपच्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने भारतावर पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी १२६ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता सामन्याच्या चौथ्या दिवशी जर इंग्लंडने यामध्ये अजून १०० धावांची भर घातली तर त्यांचे या सामन्यातील स्थान भक्कम होऊ शकते.

भारतीय संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेईल, असे सर्वांना वाटले होते. पण रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या जोडीला तिसऱ्या दिवशी जास्त धावाच करता आल्या नाहीत. जडेजाला तिसऱ्या दिवशी फक्त सहा धावांची भर घातला आली आणि तो ८७ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलला तिसऱ्या दिवशी फक्त ९ धावा करता आल्या आणि तो ४४ धावांवर बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय संघ हा ७ बाद ४२१ धावांवर होता, त्यांचा डाव तिसऱ्या दिवशी ४३६ धावांतच आटोपला. त्यामुळे भारताला यावेळी मोठी आघाडी घेता आली नाही. त्यामुळे आता इंग्लंडच्या संघाला लवकर बाद करण्याची रणनिती भारतीय संघाची होती. पण त्यांना यामध्ये यश आले नाही. कारण इंग्लंडच्या संघाला ४५ धावांची सलामी मिळाली. त्यानंतर ऑली पोप फलंदाजीला आला आणि त्याने भारताच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. पोपने यावेळी सुरुवातपासूनच भारताच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. एका बाजूने विकेट्स पडत असल्या तरी त्याच्यावर कोणताही फरक पडत नव्हता. तो आपल्याच सूरात फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. आजचा संपूर्ण दिवस त्याने खेळू काढला आणि १७ चौकारांच्य जोरावर नाबाद १४८ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला तिसऱ्या दिवशी शतकी आघाडी मिळवता आली. आता तिसऱ्या दिवशी पोप किती काळ फलंदाजी करतो, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 27-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here