रत्नागिरीत आजपासून चाचा नेहरू बाल महोत्सव

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो.
यावर्षी या महोत्सवात नगर परिषद शाळांमधील संस्थाबाह्य मुलेही सहभागी होणार आहेत.

बाल महोत्सवात क्रिकेट, खोखो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ x १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामुहिक गायन, नाटिका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन इत्यादी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here