अध्यादेशाचा कायदा आणि एकाला तरी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : मनोज जरांगे-पाटील

0

मुंबई : जोपर्यंत या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्यांतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.

त्यामुळे या कायद्यांतर्गत एकाही मराठ्याला आरक्षण मिळालं की, आंदोलनाचं पुढं काय करायंच हे ठरवू, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी (२९ जानेवारी) रायगडावर जाईन आणि ३० जानेवारीला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारील घरी जाणार असल्याचं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं.

राजपत्र क्वचितच निघते!
मुंबईतील आंदोलन हे शांततेत पार पडलं. त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांचे मला फोनही आले. सर्व जण शांततेत आले-गेले त्यांचे मनापासून कौतुक. यामध्ये सगेसोयरे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्या शब्दासाठी सरकारने १५ दिवस लावले. हे अध्यादेशाचं परिपत्रक आहे. त्यामुळे याबाबत गाफिल राहून चालणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना या कायद्याचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्या सोयऱ्यांना सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. खरा गुलाल हा कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर आणि एकाला तरी त्या कायद्यांतर्गत प्रमाणपत्र मिळाल्यावर उधळू. त्यावेळी विजयी कार्यक्रम करू. कारण सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघणे खूप महत्वाचे होते, असे राजपत्र क्वचितच निघते. याच कायद्यात रूपांतर होणार आहे. ते होईपर्यंत आपण सावध राहायचं असतं, असं जरांगे पाटील म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here