खेड : डोळ्यात गेलेला गळ काढण्यात ‘इन्फिगो’ला यश

0

खेड : डोळ्यात लोखंडी (गळ) आकडा जाणे ही अतिशय दुर्मीळ व भयावह परिस्थितीमध्ये अतिशय अवघड शस्त्रक्रिया करण्यात इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलने यश मिळवले.

खेड तालुक्यातील रसाळगड येथील रहिवासी विनोद काते यांच्या उजव्या डोळ्यामध्ये शेतीचे काम करतेवेळी मच्छीमारीसासाठी वापरण्यात येणारा लोखंडी गळ गेला. यागळाला उलट्या बाजूनेही हूक असल्याने डोळ्यातून हूक सहजासहजी काढता येणे शक्य नव्हते. या रुग्णाला मोठ्या प्रमाणात वेदना होत होत्या. या रुग्णास तत्काळ खेडमधील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलला आणण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये येताच डॉ. दीपाली बनारसे यांनी तपासणी केली. त्यानंतर डोळ्यात गेलेला आकडा (गळ) काढणे अत्यंत गरजेचे असल्याने त्वरित शस्त्रक्रिया करून तो आकडा (गळ) बाहेर काढला. यामुळे या रुग्णाची वेदनेपासून सुटका झाली. अशाप्रकारे अतिशय अवघड व तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलला यश आले.

याप्रसंगी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी अत्याधुनिक सुविधा असलेल्या इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here