रत्नागिरी : नांदिवडे सरपंचांच्या उपोषणाकडे प्रशासन व जेएसडब्ल्यूचे दुर्लक्ष

0

रत्नागिरी : जेएसडब्ल्यू एनर्जी व जेएसडब्ल्यू पोर्टकडून स्थानिक कामगार व ग्रामस्थांसह सीएसआर फंड वापराबाबत नांदिवडे ग्रामपंचायतीवरही अन्याय केला जात असून, या विरोधात नांदिवडे सरपंच व सदस्यांसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. कंपनी व प्रशासनाकडून या आंदोलकांकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नांदिवड ग्रामपंचायतीच्या सरपंच आर्या अमित गडदे व सदस्य संकेत प्रकाश मेने यांनी प्रजासत्ताक दिनापासून जेएसडब्ल्यू विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या दोघांनाही नांदिवडेसह परिसरातील ग्रामस्थांनी साथ देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनीही दोघांना पाठिंबा दिला आहे.

कंपनीमध्ये असणाऱ्या स्थानिक कामगारांच्या वेतन वाढीचा प्रश्न अनेक वर्ष अधांतरीच आहे. त्याचप्रमाणे रोहीत गडदे या तरुणाला कायमस्वरूपी कंपनीत सामावून घ्यावे ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोकळ्या जागेतील कर आकारणीकडे कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. सीएसआर फंडाच्या वापराबाबत, करणाऱ्यांवर अन्यायबाबतही वारंवार मासेमारी होणाऱ्या आवाज उठवूनही दुर्लक्ष केले जात आहे. नवीन भरती करताना स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात यावेसह विविध विषयावर सरपंच आर्या गडदे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रजासत्ताक दिनाला उपोषण सुरू करुन आज दुसरा दिवस आहे. परंतु कंपनीसह जिल्हा प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या आमरण उपोषणाला जयगडमधील मच्छीमारांनीही पाठिंबा दिला आहे. चाफेरी ग्रामस्थांनीही उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दिला. पंचक्रोशीतून या उपोषणाला पाठिंबा वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here