खेड : मराठी पाट्या लावण्यासंदर्भात मनसेचे उपोषण स्थगित

0

खेड : मराठी पाट्या दुकाने आणि कार्यालयांवर लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील खेडमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या मनसे पदाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण प्रशासनाला १५ दिवसांची कार्यवाईसाठी मुदत देऊन स्थगित करण्यात आले.

खेड उपविभागीय अधिकारी डॉ. जस्मिन यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतही मराठी पाट्या लावण्याबाबत अंमलबजावणी झाली नाही म्हणून मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस संजय आखाडे आपल्या सहकाऱ्यांसह प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसले. यावेळी मनसेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी जैस्मिन, तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी भेट दिली. यावेळी मनसे पदाधिकारी यांनी १५ दिवसांची मुदतीत दुकाने व कार्यालयांवरील पाट्या मराठी नाही झाल्या तर ज्यांच्या दुकानांवरील पाट्या फुटतील त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा संजय आखाडे यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here