थंडीचा जोर ओसरतोय! आज राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसे होते तापमान?

0

मुंबई : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने थंडींचा जोर ओसरत असल्याचे दिसून आले. लातूर जिल्ह्यात १९.९ अंश तापमानाची नोंद झाली तर सोलापूर १८ अंशांवर पोहोचले आहे.राज्याला कडाक्याच्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार आज लातूरमध्ये १९.९ अंश तापमानाची नोंद झाली. तर नांदेडमध्ये १७ अंश किमान तापमान नोंदवले गेले. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंशांवर गेले आहे. थंडीचा जोर हळुहळु ओसरत असल्याचे दिसत आहे.

पश्चिम हिमालयीन व परिसरात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. मागील चार दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसून आले. दरम्यान मराठवाड्यात किमान तापमान चढल्याचे आज दिसून आले. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हुडहुडी कायम आहे.

मुंबई पुण्यात काय स्थिती?

मुंबईत किमान तापमान चढत असून कुलाबामध्ये २३.७ अंश तापमान होते. तर सांता क्रूज भागात १८.४ अंश तापमानाची नोंद झाली.

पुण्यात शिवाजीनगर परिसरात १५.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. दौंडमध्ये १४.५, बारामती १६.०, तर पाषाण भागात १२.४ अंशांची नोंद झाली.

मराठवाड्यात पारा चढता..

मराठवाड्यात तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. धाराशिवमध्ये १७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. जालन्यात १५ अंश तर हिंगोलीत १४.८ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

कोणत्या भागात कसे होते तापमान?

DISTRICTSTATIONTEMP MAX (‘C)TEMP MIN (‘C)
AHMEDNAGARAHMEDNAGAR29.814.4
AHMEDNAGARKOPERGAON30.114.3
AHMEDNAGARRAHURI31.713.7
AKOLAAKOLA_AMFU32.813.3
AMRAVATIAMRAVATI32.712.7
AURANGABADAURANGABAD_KVK29.214.5
BEEDAMBEJOGAI
BHANDARABHANDARA
BHANDARASAKOLI_KVK30.011.2
BULDHANABULDHANA_KVK28.813.8
BULDHANALONAR31.116.1
DHULEDHULE34.915.9
GADCHIROLIGADCHIROLI_KVK31.2
HINGOLIHINGOLI30.114.8
JALGAONCHOPDA
JALGAONJALGAON35.114.7
JALNAJALNA30.515.0
KOLHAPURKOLHAPUR_AMFU30.816.5
LATURLATUR33.119.9
MUMBAI_CITYMUMBAI_COLABA30.523.7
MUMBAI_CITYMUMBAI_SANTA_CRUZ34.518.4
NAGPURNAGPUR13.2
NAGPURNAGPUR_CITY32.311.5
NAGPURNAGPUR_KVK29.712.4
NANDEDNANDED31.517.0
NANDURBARNANDURBAR_KVK31.713.4
NANDURBARNAVAPUR
NASHIKKALWAN32.913.0
NASHIKMALEGAON31.616.3
OSMANABADOSMANABAD32.917.8
OSMANABADTULGA_KVK29.815.0
PALGHARPALGHAR_KVK31.119.2
PARBHANIPARBHANI_AMFU30.712.0
PUNENIMGIRI_JUNNAR15.7
PUNECAGMO_SHIVAJINAGAR33.515.1
PUNECHRIST_UNIVERSITY_LAVASA29.614.5
PUNECME_DAPODI31.616.7
PUNEINS SHIVAJI_LONAVALA31.115.6
PUNEKHUTBAV_DAUND30.614.5
PUNELONIKALBHOR_HAVELI29.913.0
PUNENARAYANGOAN_KRISHI_KENDRA29.713.6
PUNENIASM_BARAMATI30.316.0
PUNEPASHAN_AWS_LAB30.812.4
PUNERAJGURUNAGAR32.915.4
PUNETALEGAON32.214.3
RAIGADIIG_MO_ALIBAG35.919.1
RAIGADKARJAT35.415.8
RATNAGIRIDAPOLI34.917.1
RATNAGIRIRATNAGIRI
SATARABGRL_KARAD26.112.8
SATARAMAHABALESHWAR24.716.0
SATARASATARA30.416.1
SINDHUDURGDEVGAD35.0
SOLAPURMOHOL_KVK31.713.3
SOLAPURSOLAPUR33.818.1
WARDHAWARDHA31.614.3
WASHIMWASHIM_KVK30.211.8
YAVATMALYAVATMAL31.018.5

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here