डेरवण येथे ३०, ३१ जानेवारीला क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव

0

रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ३० आणि ३१ जानेवारी रोजी डेरवणच्या एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींची शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा कार्यरत आहेत. यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास व्हावा, या हेतूने विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागात मुलींचे २० व मुलांचे २३ अशी एकूण ४३ शासकिय वसतीगृहे व १ निवासी शाळा कार्यरत आहे. शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुदृढ व सक्षम नागरिक बनविण्यासाठी विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, तर दि. ३१ जानेवारी रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. या क्रीडांगणावर स्पर्धेदरम्यान क्रिकेट, खो-खो, बॅडमिंटन तसेच सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.

या महोत्सवात मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी व संघ तसेच मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here