चिपळूण : गोविंदगड चढण्याच्या स्पर्धेत सोहम व सानिया हरवडे प्रथम

0

चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने आयोजित गोविंदगड चढण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत मुलांमध्ये सोहम हरवडे तर मुलींमध्ये सानिया हरवडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चिपळूण शहर व शाखा गोवळकोट यांच्यावतीने घेण्यात आली.

तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व गड-किल्ल्यांची माहिती मिळावी या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आल्याचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी सांगितले. स्पर्धेचा शुभारंभ मनोज शिंदे यांच्या हस्ते तसेच सुषमा कासेकर यांनी झेंडा दाखवून केला. राजे प्रतिष्ठानचे संकेत राऊत, प्रशांत पोतदार यांनी गोविंदगडाची माहिती दिली. सूत्रसंचालन उदय जुवळे यांनी केले, तर संकेत शिंदे यांनी आभार मानले.

या स्पर्धेत मुलांमध्ये सोहम हरवडे, सार्थक मोरे, आयुष भैरवकर, विघ्नेश साळवी, सार्थक चव्हाण यांनी तर मुलींमध्ये सानिया हरवडे, प्रांजल कांबळी, तनुश्री गोरिवले, श्रेया सैतवडेकर, वेदिका हरवडे यांनी अनुक्रमे यश मिळविले. विजेत्यांना ४ फेब्रुवारीच्या कार्यक्रमावेळी गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी शशिकांत मोदी, उदय जुवळे, संकेत शिंदे, सुषमा कासेकर, बाबा टाकळे, श्री. किल्लेकर, मंदार कानापडे, विशाल बेचावडे, संतोष शिंदे, प्रकाश इचले आदींनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here