चिपळूण : डॉ. यतीन जाधव, सीमा चाळके यांना पुरस्कार

0

चिपळूण : येथील डॉ. यतीन जाधव यांना ‘प्राईड पर्सन ऑफ डिस्ट्रिक्ट’ आणि सीमा चाळके यांना ‘प्राईड वुमन ऑफ डिस्ट्रिक्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, तसेच प्रत्येकी दोन प्रकारच्या सन्मानपत्रांनी पुरस्कारकर्त्यांना गौरवण्यात आले. पुरस्कार प्रदान करतानाच प्रत्येकाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली व सन्मानपत्राचेही वाचन करण्यात आले.

आमदार शेखर निकम, माजी आ. सदानंद चव्हाण तसेच डीवायएसपी राजेंद्र राजमाने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रारंभी हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अंजली कदम तसेच कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.

आ. शेखर निकम म्हणाले, हेल्प फाऊंडेशनने योग्य व्यक्तींची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. डॉ. यतीन जाधव हे सर्व क्षेत्रात काम करत असून त्यांची वाटचाल मी पाहत आहे. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदत केली आहे. यावेळी आ. निकम यांनी सीमा चाळके यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामाचे कौतुक केले. यावेळी छायाचित्रकार अनिल फाळके व वृत्तपत्र विक्रेते मधुकर कांबळी यांचाही सन्मान करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here