राज्य मागासवर्ग आयोगाने बोलावली बैठक, ‘या’ विषयावर होणार चर्चा…

0

पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा संवेदनशील बनलेला असताना उद्या (30 जानेवारी) रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून, आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यासह आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत.

या बैठकीत सध्या सुरु असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा होणार आहे. या सर्वेक्षणासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आलय. मात्र, सर्वेक्षण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र, सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून त्याआधारे मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल कसा लवकर तयार करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्या निकषानुसार सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर सुरु आहेत. मात्र, अनेक ठिकाणी याबाबत अडचणी येतांना देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाने उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत त्यामुळे या बैठकीत कोणत्या-कोणत्या मुद्यावर चर्चा होते हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला असतांना ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here