१५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आदेश

0

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात राहुल नार्वेकर काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरील अपात्रतेसंदर्भात निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here