परप्रांतीय पाडवी, वळवींसह तडवींची पाळेमुळे खोदून काढल्याशिवाय राहणार नाही; ‘ऑफ्रोह’च्या सर्वसाधारण सभेतून राजेश सोनपरोतेंचा इशारा

0

रत्नागिरी : आपण ‘वादग्रस्त’ जमाती असलो तरी आपण खरे आदिवासी आहोत. पाडवी हे ‘राजपूत’ आहेत. या पाडवी,वळवी व तडवी हे परप्रांतीय असून यांनी मुळ आदिवासींच्या सवलती लाटल्या असून यांचे पाळेमुळे ऑफ्रोह खोदून काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऑर्गानायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह)चे राजेश सोनपरोते यानी दिला आहे.

ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) रत्नागिरी व ऑफ्रोह महिला आघाडीची तिसरी सर्वसाधारण सभा ,हळदीकुंकू व प्रबोधनात्मक कार्यक्रम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ऑफ्रोह महिला आघाडीचया उपाधयक्षा प्रियाताई खापरे कविवर्य ‘क्षितिज’ कार प्रकाश सावंत, अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर काॅलेजच्या अध्यापिका विस्मया कुलकर्णी, ठाणे महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा विद्याताई पिंजरकर, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके , पोमेंडी-कारवांची वाडी येथील सरपंच ममता जोशी,ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, कोकण विभागीय सहसचिव गजानन उमरेडकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषाताई पारशे, कार्याध्यक्षा राजकन्या भांडे,ऑफ्रोह रत्नागिरीच्या उपाध्यक्ष नंदा राणे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

केंद्राकडून निधी घेत असतांना विस्तारीत क्षेत्रातील 61 % आदिवासींची लोकसंख्या वापरायची ,मात्र लाभ देत असताना पडताळणी समित्यांना हाताशी धरून षडयंत्र रचून जातीचे प्रमाणपत्र अवैध करायचे व लाभ मात्र 39% असलेल्या केवळ 12 जमातींनीच लाटायचा. महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या ह्या अनुसूचित जमातीच्या प्रस्तापित आमदारांच्या इशारावर नाचतात, असा घनाघातही सोनपरोतेंनी यावेळी केला.

प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ऑफ्रोहचे कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवलन व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान बिरसा मुंडा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सुपारीचे रोपे देवून करण्यात आले. ऑफ्रोह रत्नागिरीचे सचिव बापुराव रोडे मागील वर्षाच्या इतिवृत्ताचे वाचन व जमा-खर्च अहवाल व सन 2024-25 चे अंदाजपत्रक सादर केले.

यावेळी अध्यापिका विस्मया कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. प्रियाताई खापरे,कविवर्य प्रकाश सावंत, सरपंच वैष्णवी नेटके , सरपंच ममता जोशी,गजेंद्र पौनीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिला भगिंनी हळदीकुंकू व वाण वितरीत करण्यात आले.

किशोर रोडे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन महिला आघाडीच्या सचिव सुनंदा देशमुख यांनी केले. यावेळी ऑफ्रोहचे जिल्ह्यातील कर्मचारी सभासद उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here