पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक भगीरथ : बाळासाहेब माने

0

रत्नागिरी : सर्वांच्या घरात नळाद्वारे स्वच्छ मिळावे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन योजना आणून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्याचे काम केले आहे.

भगीरथाने गंगा आणली त्याचप्रकारे घराघरांत स्वच्छ पाणी देऊन एकविसाव्या शतकाचे नरेंद्र मोदी हे आधुनिक भगीरथ आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा सहसंयोजक बाळ माने यांनी केले.

जलजीवन मिशन अंतर्गत राजापूर तालुक्यातील बेनगी वारीकवाडी, भंडारवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन प्रजासत्ताक दिनी माजी आमदार तसेच लोकसभा सहसंयोजक बाळासाहेब माने यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, गावाचा विकास भाजपच करू शकतो. कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायतीमधून गावचा सर्वांगीण विकास सुरू आहे. केंद्रात आणि गावात भाजपाची सत्ता आहे. परंतु खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपला हक्काचा माणूस नसल्याने अडचण निर्माण होते. ही अडचण येणाऱ्या निवडणुकीत दूर करून भाजपाचा खासदार निवडून देऊ या. नरेंद्र मोदींच्या कार्याला समर्थन देण्यासाठी फक्त एक फोन कॉल देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पाणी योजनेचा लाभ बेनगी वारीकवाडी व भंडारवाडी परिसराला होणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत घराघरात पिण्याचे स्वच्छ पाणी नळाद्वारे पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. या दोन्ही वाड्यांमधील योजनेसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी कोंडसर बुद्रुकच्या सरपंच आरती मोगरकर, उपसरपंच प्रमोद वारीक, भाजपा तालुका सरचिटणीस बाळ दाते, ग्रामपंचायत सदस्य प्रांजल परकर, आण्णा तळये, अजित धावडे, अनुलोमचे रवींद्र भोवड, शक्तिकेंद्रप्रमुख संदीप वारीक, दीपक वारीक, दत्तू वारीक, सचिन पारकर, प्रकाश पारकर, संतोष पारकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here