स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, मेहनत घ्या : जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

0

रत्नागिरी : स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, त्यासाठी कठोर मेहनत घ्या, कोणतीही गोष्ट मन लावून करा, संयम आणि विनयशीलता ठेवा, या पंचसूत्रीआधारे विद्यार्थिनींनी यश मिळवावे, असे आवाहन प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए, नर्सिंग व फॅशन डिझायनिंग कॉलेजच्या उत्कर्षम् या वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संस्थेच्या पवार सभागृहात शनिवारी सकाळी कार्यक्रम झाला. या वेळी प्रकल्प सदस्य प्रसन्न दामले, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी, सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, बीसीएसच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग कॉलेजच्या प्र. प्राचार्य अर्चना बाईत, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी कर्वे, बाया कर्वे व भारतमाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. स्मिता सुतार यांनी मार्गदर्शन करताना सोशल मीडियाचा वापर कसा करावा, दक्ष राहिले पाहिजे यासंदर्भात माहिती दिली. मिस उत्कर्षमचा सन्मान खुशी गोताड हिने पटकावला. हर्षिता शेट्ये हिला द्वितीय क्रमांक मिळाला. एसवायबीसीएच्या वर्गाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.

उत्कर्षममध्ये क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. यात रस्सीखेच, डॉजबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, मेहंदी, रांगोळी, वादविवाद, निबंध लेखन, पोस्टर मेकिंग, गुगल हंट, कोडिंग, फोटोग्राफी, फॅशन शो यांचा समावेश होता. प्रा. निमिषा शेट्ये यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here