विज्ञान शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यकांसाठी रत्नागिरीत प्रशिक्षण

0

रत्नागिरी : विज्ञान शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यकांसाठी रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात १ ते ३ फेब्रुवारी या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

मराठी विज्ञान परिषद ही मराठीतून विज्ञान प्रचार व प्रसार करणारी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था असून संस्थेच्या ६१ विभागातील एक विभाग रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आहे. संस्थेचे विविध विज्ञानभिमुख उपक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात. शाळांमधील प्रयोगशाळा सहाय्यकांना प्रशिक्षण देण्याची शिबिरे गेल्या वर्षीपासून परिषद घेत आहे. यावर्षेच शिबिर १ ते ३ फेब्रुवारी या काळात होणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विज्ञान शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक यांना आधुनिक प्रयोगशाळेची संकल्पना समजावी, प्रयोगशाळेतील नवी, जुनी उपकरणे यांची निगा, देखभाल, दुरुस्ती करता यावी तसेच प्रयोगशाळेसंदर्भात विविध कागदपत्रे यांची माहिती व्हावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील शाळांमधील प्रयोगशाळा सहाय्यक आणि हे काम करणारे विज्ञान शिक्षक यांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here