पंकजा मुंडे जरांगेंना म्हणाल्या,’ओबीसीत आपले स्वागत’; अशी होती जरांगेंची प्रतिक्रिया…

0

बीड : शहरात एका विवाह सोहळ्यात माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील एकत्र आले हाेते. पंकजा यांनी जरांगे यांचे ‘आपला ओबीसीत समावेश झाला असून तुमचे स्वागत आहे,’ अशा पद्धतीने स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

माजलगाव शहरात रविवारी संध्याकाळी विवाह सोहळा पार पडला. यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी विविध पक्षांचे नेते आले होते. यावेळी मनोज जरांगे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मनोज जरांगे यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच होत आहे. त्यांचा शनिवारी ओबीसीमध्ये समावेश झाला असून त्यांचे ओबीसीत स्वागत आहे.’ पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर जरांगे यांनीदेखील स्मितहास्य करत दाद दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here