चिपळूण : नांदगाव खुर्द ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन

0

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील नांदगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत इमारत बांधणेसाठी जनसुविधा निधी अंतर्गत निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर यांचे आभार मानले. आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना, झालेल्या विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेतला.

इमारतीसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. तसेच उर्वरीत कामे पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास दिला. यावेळी सरपंच संजीवनी कांबळे, उपसरपंच संतोष कांबळे, सुरेश लाड, जि. प. गट अध्यक्ष संजय कदम, कुशिवडे उपसरपंच सिद्धार्थ कदम, ग्रामसेवक प्रीती सुर्वे, आबा भिंगार्डे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here