कोकण आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत ३३० कोटी ६८ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

0

रत्नागिरी : कोकण आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिनीसाठी २२९.६० कोटी तर, बहुउद्देशीय निवारा केंद्रासाठी १०१.०८ कोटी अशा एकूण ३३० कोटी ६८ लाखाच्या कामांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंजूर कामाची माहिती खालील प्रमाणे :
भूमिगत विद्युत वाहिनी – रत्नागिरी ग्रामीण २ येथील कामासाठी ८७.७३ कोटी रुपये मंजूर, भूमिगत विद्युत वाहिनी रत्नागिरी ग्रामीण १ येथील कामासाठी ६४.६२ कोटी रुपये मंजूर,

भूमिगत विद्युत वाहिनी – रत्नागिरी शहरासाठी ७७.२५ कोटी रुपये मंजूर ‘बहुउद्देशीय निवारा केंद्र, गणपतीपुळे १४.४४ कोटी रुपये मंजूर, बहुउद्देशीय निवारा फणसोप केंद्रासाठी १४.४४ कोटी रुपये मंजूर,

बहुउद्देशीय निवारा केंद्र, नेरवी १४.४४ कोटी रुपये मंजूर, बहुउद्देशीय निवारा केंद्र, खेडशी, १४.४४ कोटी रुपये मंजूर, बहुउद्देशीय निवारा केंद्र १४.४४ कोटी मंजूर, बहुउद्देशीय निवारा केंद्र, वाये, १४.४४ कोटी रुपये, बहुउद्देशीय निवारा केंद्र, कुरचुंडा १४.४४, कोटी रुपये मंजूर देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here