भाजपा कामगार मोर्चा दक्षिण कोकण उपाध्यक्षपदी प्रवीण लिंगायत

0

◼️ माजी खासदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चा दक्षिण कोकण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून रत्नागिरीतील भाजपा कार्यकर्ते व्यावसायिक प्रवीण लिंगायत यांची नियुक्ती झाली आहे.

भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या निर्देशनुसार कोकण दक्षिण विभाग संयोजक लीलाधर भडकमकर यांनी नुकतीच ही नियुक्ती घोषित केली.

दक्षिण कार्यकारिणीकडून नियुक्तीपत्र स्विकारल्यानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनीही प्रवीण लिंगायत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रवीण लिंगायत यांची बालाजी सिक्युरिटी फर्म असून कामगारांच्या प्रश्नाचा अभ्यास आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कामगारांच्या प्रश्नांना वाचा फुटण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्रवीण लिंगायत यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here