Ratnagiri : एसटीने वर्षभरात कापले ६५ हजार १६० कि.मी.चे अंतर

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या एकूण मार्गाची लांबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षापर्यंत म्हणजे सन २०२२-२३ मध्ये ७९४ एसटींनी तब्बल ६५ हजार १०७ कि.मी. पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी गाड्यांनी मार्गक्रमण केले. त्यामुळे सर्वसामान्यांचा आजही एसटीवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट होत आहे. विभागीय नियंत्रक कार्यालयाकडील माहितीनुसार गेल्यावर्षी प्रवाशांची दैनिक सरासरी २ लाख २५ हजार इतकी होती.

एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कोरोना काळात सर्वांबरोबर एसटीचा प्रवासही थांबला होता. आता मात्र एसटी पूर्णपणे जोशात आहे. सन २०२१-२२ पर्यंत एसटी दुर्लक्षित झाल्यासारखी होती. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीचे मध्यवर्ती बसस्थानक गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. अजूनही रहाटागर बसस्थानकातूनच सर्व मार्गावर जाणाऱ्या गाड्या सोडल्या जात आहेत.

मध्यवर्ती बसस्थानक अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने ओरड होत असली तरी एसटी प्रवासावर आणि प्रवाशांवर फारसा परिणाम झाला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

२ लाख २५ हजार प्रवाशांचा दैनंदिन प्रवास
रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बसस्थानकातून ७९४ एसटीच्या गाड्यांनी सन २०२२-२३ मध्ये ७८५ मार्गांवर ६५ हजार १६० कि.मी. पर्यंत धावल्या आहेत. एसटीच्या प्रवासी संख्येमध्येसुद्धा वाढ झाली आहे. विभागीय नियंत्रक कार्यालयाकडील माहितीनुसार गेल्यावर्षी प्रवाशांची दैनिक सरासरी २ लाख २५ हजार इतकी होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here