१ ऑगस्ट रोजी राज्यात भाजपाचे अभिनव दूध आंदोलन

0

मुंबई : दूध उत्पादकांना प्रति लिटर 10 रु.अनुदान द्यावे या मागणीसाठी भाजपातर्फे 1 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे. ‘मुख्यमंत्री दूध प्या, दुधाला भाव द्या’, या आंदोलनात रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम हे मित्र पक्षही सहभागी होणार असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटात लॉक़डाऊनमुळे दूध व्यवसाय डबघाईला आला आहे. दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली तसेच दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. दूध उत्पादक शेतक-यांना या संकटकाळी सावरण्याची गरज असून राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दुध प्रती लिटर ३० रु. दराने खरेदी करावे या मागण्यांसाठी हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. हे अभिनव आंदोलन शांततापूर्ण आंदोलन असून आंदोलना दरम्यान कुणीही दुधाची नासाडी करणार नाही, असं स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाचा उद्देश हा केवळ मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवणे आहे, असं श्री. बोंडे यांनी सांगितल. तेव्हा सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:32 PM 17-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here