लांजा : पल्लीनाथ मंदिरात कारसेवकांचा सन्मान

0

रत्नागिरी : अयोध्येतील राममंदिर पुनर्निर्माण आणि राममूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याच्या दिवशी मठ (ता. लांजा) येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेचा भाग म्हणून मंदिरात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत दिमाखदार कार्यक्रम झाले.

पवमान पंचसूक्ताने अभिषेक व सायंकाळी आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तीन हजार पणत्या प्रज्वलित करून दोपोत्सव करण्यात आला. मंदिरावर विद्युत रोषणाईही करण्यात आली. मंदिराभोवती सवाद्य भोवत्या घातल्या. पालखी नृत्य करण्यात आले. रामरक्षा पठण आणि नामजप करण्यात आला. त्यामध्ये लहान मुलांची उपस्थिती लक्षणोय होती. महिला आणि तरुणांनीही सर्वं कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

अयोध्येत १९९० मध्ये कारसेवा केलेल्यांचा कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सुधाकर श्रीराम चांदोरकर (रत्नागिरी), सतोश जयराम चांदोरकर (आंजणारी), शिरीष शितृत (रत्नागिरी), प्रवीण सावंत (पाली), प्रमोद खटकूळ (नाणीज), ऋषिकेश राऊत (कै. सदानंद राऊत यांच्या वतीने), नितीन शेट्ये (लांजा), मनोज सुर्वे (पाली), शेखर संसारे (नाणीज), उज्ज्वला धामणस्कर (रत्नागिरी), प्रफुल्ल सप्रे (लांजा) यांचा समावेश हाता. सन्मानपत्र, मंदिराची प्रतिकृती, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

प्रातिनिधिक स्वरूपात प्रवीण सावंत, उज्वला धामणस्कर, शेटे या कारसेवकांनो कारसेवेतील आपले अनुभव सांगितले. प्रवीण राऊत यांना कारसेवेतील सहभागाबद्दल पकडण्याचे आदेश दिले होते. पण पोलिसांना चकविण्यात यशस्वी झाले. पण विवादित ढाचा पाडण्यात सहभाग असलेल्या कोठारी यांच्यावर त्यांच्या डोळ्यदिखत गोळ्या घालण्यात आल्या. हा त्यांनी सांगितलेला प्रसंग ऐकल्यानंतर सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. आता मंदिर उभे राहिल्यामुळे हा खूपच भाग्यशाली दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक हिंदूसाठी हा स्वाभिमानाचा दिवस आहेच, पण अयोध्येतील राममंदिर म्हणजे राष्ट्रमंदिर ठरावे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here