दापोली : साखळोली शाळेत इंटरनेट सेवा सुरू

0

गावतळे : दापोली तालुक्यापासून अवघ्या ९ किलोमीटरवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा, साखळोली येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नांनी २७ जानेवारी रोजी इंटरनेट सेवेला प्रारंभ झाला. साखळोली विकास सेवा संस्थेचे चेअरमन वसंत शिंदे यांनी काही दिवसांपूवीं व्यवस्थापन समितीला दिलेले आश्वासन पूर्ण केले.

प्रजासत्ताक दिनी संस्थेचे संचालक प्रकाश भुवड, सरपंच दीक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव आदीच्या हस्ते व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गोरीवले, मुख्याध्यापक संजय मेहता यांच्याकडे वाय-फाय राऊटर सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे शाळेची सर्व कामे, तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे मिळण्यास सुलभ होणार आहे, असे मुख्याध्यापक मेहता यांनी सांगितले. याचप्रसंगी विश्वकर्मा पांचाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाकवली यांच्यामार्फत शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा संस्थेचे संचालक पंढरीनाथ देवघरकर, रामकृष्ण धामणस्कर आर्दीच्या हस्ते शाळेला प्रदान करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here