राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश, 27 फेब्रुवारीला मतदान

0

नवी दिल्ली : राज्यसभेच्या (Rajya Sabha) महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलं आहे. येत्या 27 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे.

तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपत आहे. 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातून 2024 मध्ये कोणते खासदार निवृत्त होणार?

  • माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
  • केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
  • काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
  • शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
  • भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
  • राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण

29 फेब्रुवारीला चित्र होणार स्पष्ट

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर आमदार कोणाला मतदान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकांची एकूण प्रक्रिया 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 27 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 29 फेब्रुवारीला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपत आहे. ओडिशा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 ला संपणार आहे.

यंदाच्या वर्षात राज्यसभेतून भाजपचे 60 खासदार निवृत्त होणार

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक म्हणजेच, तब्बल 60 खासदार भाजपचेच आहेत. यापैकील 57 खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या भाजपच्या राज्यसभा खासदारांमध्ये केंद्री मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावांचा समावेश होतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here