माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज, नाणीज येथे ISRO-IIRS चे सेमिनार संपन्न

0

◼️ शास्त्रज्ञ बनण्यासाठी लहानपणापासूनच जिज्ञासू वृत्ती ने प्रयत्न करा : श्री. धनेश बोरा

रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिक्षणोत्तेजक मंडळ नाणीज संचलित माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज नाणीज यांच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी ISRO-IIRS अंतर्गत नोडल सेंटर,नाणीज कडून सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज, नाणीज ला ISRO – IIRS चे इन्स्टिट्यूट नोडल सेंटर ची मान्यता प्राप्त झाली. नोडल सेंटर वर राबविण्यात येणारे विविध कोर्स व ISRO यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी या सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते.

या सेमिनार साठी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून वैज्ञानिक सन्मा. धनेशजी बोरा , प्रा.श्री.वर्मा सर आणि वास्तू शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद वासुदेव उपस्थित होते. यावेळी मा..बोरा सर यांनी ISRO चे येणारे नवीन प्रोजेक्ट, इन्स्टिट्यूट नोडल सेंटर वर रजिस्ट्रेशन कसे करावे, आपण ISRO चे विद्यार्थी कसे व्हायचे, आपले प्रयोग ISRO ला कसे सादर करायचे. कमी खर्चा मध्ये सॅटेलाईट कसे तयार करायचे, या संदर्भात मार्गदर्शन केले.मा.धनेश बोरा सर यांनी स्वत: ISRO च्या 7 प्रोजेक्ट मध्ये केलेल्या कामातील अनुभव सांगितले.सामान्य विद्यार्थी ते वैज्ञानिक हा प्रवास कसा झाला हे सांगताना त्यांनी लहान वयात असल्यापासून विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन, प्रयोग शाळा यात सक्रिय सहभाग का घ्यावा हे पटवून सांगितले. संस्कार, मेहनत आणि यश याच्यामध्ये वाचन किती महत्वाचे आहे आणि यासाठी ग्रंथसंपदा कशी मदत करते हे ही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. वास्तूशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वासुदेव यांनी आपल्या मार्गदर्शनात मेहनती शिवाय यश मिळणार नाही हे सांगीतले.

सेमिनारची सुरवात दीपप्रज्वलन आणि विद्येची देवता सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार झाले. .या नंतर कॉलेज विभागामार्फत बनविण्यात आलेल्या चांद्रयानाच्या मॉडेल चे लॉन्चिंग करण्यात आले. आपल्या प्रास्तविकामध्ये मुख्याध्यापक श्री.मोहन बनसोडे सर यांनी शाळेची वाटचाल व पुढील उद्दिष्टे यांची माहिती दिली.त्यानंतर PPT द्वारे श्रीमती निखिला लोध मॅडम यांनी नोडल सेंटर मार्फत राबविण्यात येणारे कोर्स ची माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

अध्यक्षीय भाषणात श्री. प्रशांत कदम सर यांनी ग्रामीण भागात कसे विद्यार्थी घडतील आणि आपली संस्था यावर कसे काम करत आहे याची माहिती दिली.नवीन विज्ञान प्रयोगशाळा व येणाऱ्या काळात सॅटेलाईट बनविण्याच्या कार्यशाळेची देखील त्यांनी माहिती दिली. या सेमिनार ला नाणीज शिक्षणोत्तेजक मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष श्री.कोळवणकर सर, सचिव कांबळे सर, खजिनदार संसारे सर सी.ई ओ.दरडी सर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच पाली, लांजा, साखरपा आणि नाणीज पंचक्रोशी येथील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीमती सावंत देसाई मॅडम यांनी शेवटी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे आभार मानले. अशा पद्धतीने हे सेमिनार संपन्न झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:54 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here