राज्यस्तरीय संविधान गौरव स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे घवघवीत यश

0

मंडणगड : भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त संविधान गौरव स्पर्धा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगावी आंबडवे येथे रक्षित सामाजिक संस्था – म्हसळे रायगड अंतर्गत स्थापित संविधान गुण गौरव समिती आयोजित संविधान गुण गौरव परिक्षा २०२३ आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धेमध्ये मोठया गटातून सहा प्रा मंगेश शांताराम ठसाळे यांनी घवघवीत यश संपादित करीत महाविद्यालयातून प्रथम तर राज्यस्तरीय पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला. दोन हजार रोख व चषक असे पारितोषीक चे स्वरूप होते.

तसेच यासोबत ‌ वैष्णवी मालप हिने द्वितीय तर सि‌द्धी खैरे तृतीय क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच गोरेगाव येथे संपन्न झाला. मा. विलास पवार (अध्यक्ष संविधान गुण गौरव समिती) तसेच स्पर्धेचे समनव्यक नुरखा पठाण यांच्या हस्ते सहा प्रा मंगेश ठसाळे यांना राज्यस्तरीय विजेता तर सहा प्रा अरुण ढंग यांना केंद्रप्रमुख म्हणून गौरविण्यात आले.

महाविद्यालयाचे समनव्यक डॉ. दिपक रावेरकर याचे मार्गदर्शनाखाली, प्रा. अरुण ढंग यांनी स्पर्धेचे केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. यासाठी त्यांना सहा. प्रा. अमोल राजेशिर्के तसेच शिक्षकेतर कर्मचारी उदय झाखल यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या निमित्ताने नुरखा पठाण यांनी लिहिलेल्या आपले संविधान या पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व जनतेला संविधानाप्रति जागरूक करणे, त्यांच्यात संविधान विषयक चिकित्सा निर्माण करणे, प्रत्येक घरात संविधान पोहचवणे, विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. असे महाविद्यालयाचे सहा. प्रा अरुण ढंग यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here