कलाशिक्षकांच्या चित्रांचे उद्यापासून नेहरू सेंटर कलादालनात प्रदर्शन

0

रत्नागिरी : आर्ट व्हिजन ग्रुपचे बारावे चित्र प्रदर्शन ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत कलाशिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन (वरळी, मुंबई) येथे आयोजित केले आहे. यामध्ये रत्नागिरीचे सुपुत्र कलाशिक्षक अर्जुन माचिवले आणि रोशन गोताड (खालगाव) यांची चित्रेही पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने सहभागी २५ कलाकारांना भारतीय चित्रकार पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.

माचिवले आर. एन. गांधी हायस्कूल (विद्याविहार, मुंबई) आणि गोताड गुरुकुल इंग्लिश स्कूल (कल्याण) येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नेहरू सेंटरला सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना खुले राहणार आहे. आर्टगॅलरीची भाडेवाढ, शाळेतील नोकरी, प्रवासात होणारी दमछाक तसेच इतर कौटुंबिक, सामाजिक व्याप यामुळे इच्छा असूनही अनेकजण मुंबईसारख्या शहरात प्रदर्शन भरवू शकत नाहीत तसेच एखाद्या चित्रकाराने तसे साहस केले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्र मुंबईबाहेरून मुंबई कलादालन येथे घेऊन जाणे येणे प्रवासखर्च, मुंबईबाहेरील कलाशिक्षकाचा राहण्याचा प्रश्न, हॉटेलचे भाडे यात ओढाताण होते. आर्ट व्हिजन ग्रुपने सामान्य कलाकारांची हीच अडचण ओळखून आपल्या कलाबांधवांना प्रदर्शनासाठी सहकार्य करून प्रोत्साहन देण्याचे ठरवले, असे माचिवले म्हणाले.

अर्जुन माचिवले, महेश कदम व रियाज काझी यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांनी आर्ट व्हिजन या नावाने चित्र प्रदर्शन भरवण्यात आले. यातून कलाकारांची टीम तयार झाली. या प्रदर्शनात प्रामुख्याने आपले कलाशिक्षक जे कलाध्यापन करता करता स्वतःच्या कलागुणांचा विकास करू इच्छितात त्यांना मुंबईस्थित प्रसिद्ध आर्ट गॅलरीतून कला प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. आर्ट व्हिजनच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई व खेड्यापाड्यातून कलाकारांना एकत्र घेऊन दरवर्षों प्रदर्शन केले जाते. यावर्षी आर्ट व्हिजन संस्थेला चित्र प्रदर्शनासाठी चित्रकार आनंदकिशोर मेहर यांची मदत लाभली आहे. प्रदर्शनाचे औचित्य साधून रवींद्रनाथ टागोर क्रीएटिव्ह आर्टिस्ट अॅवॉर्ड हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे माचिवले यांनी जाहीर केले.

कला हेच जीवन आहे. प्रत्येकाच्या घरात एकतरी कलाकृती असावी. अबोल भिंती बोलक्या व्हाव्यात, कलेचा विकास व विस्तार व्हावा हाच उदात्त हेतू ठेवून आर्ट व्हिजन प्रदर्शन भरवत आहे : अर्जुन माचिवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:21 PM 27/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here